*शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात 2 मे रोजी रक्तदान शिबिर*
*गोवा मेडिकल कॉलेजच्या ब्लड बँकेचे पथक उपस्थित; नागरिकांना सहभागाचे आवाहन*
*वेंगुर्ला*
रामपुरुष युवा मित्र मंडळ, परबवाडा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवार, दिनांक २ मे २०२६ रोजी हे शिबिर उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी गोवा बाम्बुळी येथील ब्लड बँकेचे पथक उपस्थित राहणार असून, सुमारे ६० ते ७० रक्तदाते रक्तदानासाठी इच्छुक असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. रक्तदानाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
सदर शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आवश्यक जागा तसेच इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती वैद्यकीय अधिकारी वर्ग-२, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच शिबिराच्या तारखेची अधिकृत मंजुरी व निश्चिती लवकरात लवकर मिळावी, अशीही मागणी आयोजकांनी केली आहे.
या उपक्रमासाठी रामपुरुष युवा मित्र मंडळाचे प्रथमेश गणेश परब, विठोबा परब, देऊ परब आदी पदाधिकारी पुढाकार घेत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. विठोबा परब – मो. न. ९४२३८७८३१५
श्री. प्रथमेश परब मो. न. – ९४०५२२७४०७
श्री. देऊ परब मो. न. ८५५२९७५९१५
