You are currently viewing आत्मनिर्भर योजनेच्या माहितीसाठी २५ नोव्हेंबर रोजी कार्यशाळा…

आत्मनिर्भर योजनेच्या माहितीसाठी २५ नोव्हेंबर रोजी कार्यशाळा…

देवगड

आत्मनिर्भर योजनेच्या माहितीसाठी कार्यशाळा आयोजन गुरुवार दि २५ नोव्हेंबर दु २ वा.रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय करण्यात आली आहे. यावेळी आमदार नितेश राणे.सौ सीमा भट व यशवंत पंडित सर हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये आत्मनिर्भर संकल्पना उद्योग योजना फंडिंग डेव्हलोपमेंट व मार्केट या सर्व विषयावर या विषयावर मार्गदर्शन ठेवण्यात आली असून खालील प्रमाणे सत्र नियोजित करण्यात आले आहे.

दुपारी २ ते ३ – देवगड तालुका उद्योग व रोजगार चे महत्व दुपारी ३ ते ४ – आत्मनिर्भीर संकल्पना व रचना ग्रुप नियोजन कामाची जवाबदारी. देण्यात येईल. दुपारी ४ ते ५ – व्यवसाय संकल्पना शासकीय योजनातून पर्यावरण व्यवसाय तालुक्याचा गरजा संबंधित कच्चा माल पक्का माल तयार करून स्वतः विक्री करणे ही आत्मनिर्भर योजनेचे सर्व महत्व सांगण्यात येईल.

देवगड येथे कातळ असल्याने थोडे युनिक आय टी कंपनी सोलार ऊर्जा प्रकल्प गोशाळा प्रकल्प, प्राथमिक गरजा चे फार्मर फूड कंपनी प्रोसेस युनिट तयार करण्यात येतील टेक्सटाईल व पर्यावरण दोन योजना व स्किल डेव्हलोपमेंट ट्रेनिंग सेंटर यावर विशेष भर देण्यात येईल. तरी आपण सर्वानी दुपारी २ वाजता जामसंडे श्रीकुष्ण मंगल कार्यालयात उपस्थिती रहावे व कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन तन्वी योगेश चांदोस्कर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − thirteen =