You are currently viewing गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जाहीर निषेध – प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा जाहीर निषेध – प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई

वेंगुर्ले

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय..
आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत.किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने मा. नारायणराव राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली.
खरंतर गोव्यातही मुबलक सिलिंडर आहेत असा भाग नाही, परंतु डॉ प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने,तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेस कडून राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जाहीर निषेध करीत आहे. कीमान आरोग्याच्या बाबतीत तरी राजकारण करु नये अशी मागणी सिंधुदुर्ग वासीयांनी केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 11 =