You are currently viewing जन्मोत्सव
Oplus_16908288

जन्मोत्सव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी संजय धनगव्हाळ लिखित वास्तववादी काव्यरचना*

 

*जन्मोत्सव*

 

ते भर रस्त्यावर धिंगाणा घालून

उघड्यावर केक कापायचे

भुकेने व्याकुळलेले किती चेहरे

तिथे उभे दिसायचे

 

मौज मस्ती आरडाओरडा कताना

स्वतःचा जन्म दिवस साजरा करायचे

सर्वसाक्षीने सरलेल्या आयुष्याची

रेष कापायचे

 

जन्माचा उत्सव साजरा करून

ते अर्धवट केक तसाच सोडून जायचे

आणि त्या फेकलेल्या जराशा घासासाठी

कितीजण भूक घेऊन पळायचे

 

*संजय धनगव्हाळ*

*(अर्थात कुसुमाई)*

९५७९११३५४७

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा