You are currently viewing शिट्टीवादन कलेतील उषकाल : उषा फाल्गुने

शिट्टीवादन कलेतील उषकाल : उषा फाल्गुने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी श्री.विलास कुलकर्णी (आप्पा) यांचा लेख*

 

*शिट्टीवादन कलेतील उषकाल : उषा फाल्गुने*

 

 

सौ. उषा दीपक फाल्गुने मूळची पुण्याची पण गेले एक वर्ष अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहे. इसवी सन 1975 मध्ये मुंबईत रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फोर्ट येथे केमिस्ट्री मध्ये एम एस सी करता करता केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल्स करताना वेळ लागायचा त्यामुळे साईड बाय साईड हळू आवाजात शिट्टी वाजवून गाणी म्हणायला लागली. ही सवय नंतर इतकी लागली की ती कॉलेजमध्ये शिकवायला लागली आणि मुलांची प्रॅक्टिकल्स घेणे व त्यांची जर्नल तपासणे इत्यादी करताना सहजरित्या अगदी तिच्या नकळत शिट्टीवर गाणे गुणगुनू लागली. ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये तिला त्याबद्दल फिश पॉंड पण मिळाला होता….

लग्नानंतर नवरा डॉक्टर मिळाल्यामुळे त्यांची गेट-टुगेदर होत असायचे तेव्हा पण तिच्या गाण्यांची फर्माईश असायची… पतीला वेगवेगळे देश पाहायची आवड असल्यामुळे दोघांनी भटकंती करत जवळजवळ 33 देशांमध्ये भ्रमंती केली आणि त्यावेळी फिरताना बस प्रवास रेल्वे प्रवास विमान प्रवास इत्यादी मध्ये सहजरित्या टाईमपास म्हणून ती गाणी गुणगुणायची…. आजूबाजूच्या सीट्सवर बसलेल्या लोकांना कुठून तरी शिट्टीचा आवाज आला की ते कोण पुरुष शिट्टीवर गाणी म्हणत आहे ते पाहायला इकडे तिकडे शोधायचे आणि जेव्हा त्यांना एक स्त्री गाणं म्हणत आहे हे ऐकून खूप कौतुक वाटायचे .

तेव्हा पण तिचा एखादा कार्यक्रम व्हायचा. उषा स्वतः भारत सरकारच्या एका प्रसिद्ध प्रयोगशाळेतून शास्त्रज्ञ म्हणून रिटायर झाली आणि आता वयाच्या 70 व्या वर्षी नुकताच पुणेरी आवाज या 107.8 एफ एम वर रामनवमीच्या दिवशी 13 श्रीरामाची गाणे तिने अमेरिकेतून रेकॉर्ड करून पाठवली आणि ती रेडिओवर प्रसारित झाली एकूण श्री रामाची 13 गाणी म्हटली परंतु संपूर्ण गाणी म्हणण्याऐवजी एक एक कडवेच म्हटले कारण गाण्याची चाल तिनही कडव्यांची एकच असेल तर शिट्टी मध्ये फारसा फरक कळत नाही ….तिला ठाऊक असलेली मराठी किंवा हिंदी गाणी ती लीलया शिट्टीवर म्हणू शकते.

मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेली उषा आता जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचची ( साकव्य ) सक्रिय सदस्या झाली आहे. समूहाकडून तिला खूप खूप शुभेच्छा.

 

विलास कुलकर्णी

जनसंपर्क अधिकारी

जागतिक साकव्य मंच

7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा