You are currently viewing माटणे उपसरपंचपदी सागर साऊ गवस यांची बिनविरोध निवड

माटणे उपसरपंचपदी सागर साऊ गवस यांची बिनविरोध निवड

माटणे उपसरपंचपदी सागर साऊ गवस यांची बिनविरोध निवड

दोडामार्ग
माटणे गावातील शिवसेना शाखाप्रमुख श्री. सागर साऊ गवस यांची माटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
सागर गवस हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि लोकांशी असलेल्या जवळिकीमुळे त्यांना ही संधी मिळाल्याचे मानले जात आहे.
उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, शिवसैनिक तसेच विविध स्तरातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार सागर गवस यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा