You are currently viewing पक्ष निरीक्षक राज राजापूरकर यांचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत..

पक्ष निरीक्षक राज राजापूरकर यांचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत..

*पक्ष निरीक्षक राज राजापूरकर यांचे जिल्ह्यात उत्साहात स्वागत..*

कुडाळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हा बैठकीत नवनिर्वाचित पक्ष निरीक्षक राज राजापूरकर यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📌 ओरोस येथील शरद कृषी भवन हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत राजापूरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षनिष्ठा, संघटन बांधणी आणि संयम यांचे महत्त्व अधोरेखित केले.
👉 “अडचणींना सामोरे जातच खरा कार्यकर्ता घडतो. सध्याच्या परिस्थितीत पक्षाचे ध्येय-धोरणे आणि आदेश काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
👉 तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षस्थितीचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

💬 यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीदरम्यान येणाऱ्या अडचणी मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपस्थित मान्यवरां मध्ये नम्रता कुबल, रेवती राणे, बाळ कनयाळकर, अनंत पिळणकर, सचिन पाटकर, नझीर शेख, शिवाजी घोगळे, रुपेश जाधव, रवींद्र चव्हाण, सदानंद मालडकर सच्चिदानंद कनयाळकर समीर आचरेकर नयन गावडे रवींद्र गावडे प्रतीक सावंत उत्तम सराफदार यांसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले.

👥 याशिवाय ओबीसी, कृषी, युवक व विद्यार्थी सेलचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔷 बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, सध्याच्या समस्या आणि कार्यकर्त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

#सिंधुदुर्ग #राष्ट्रवादीकाँग्रेस #पक्षबांधणी #कुडाळ #राजकारण

प्रतिक्रिया व्यक्त करा