You are currently viewing ग्रा.पं. निवडणुकीसाठी इव्हीएममशीनसह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना…!

ग्रा.पं. निवडणुकीसाठी इव्हीएममशीनसह कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना…!

१६६ मतदान केंद्रावर ९९६ कर्मचारी दाखल…!

तहसीलदार आर जे पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पहिली बस केंद्रावर रवाना…!

कणकवली

तालुक्यातील 58 पैकी 52 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. येथील तहसीलदार कार्यालयातून निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी इव्हीएममशीनसह अन्य साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले. यामध्ये १३ एस टी बसेस,४मिनी बस मधून १६६ मतदान केंद्रावर राखीव मिळून ९९६ कर्मचारी रवाना झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी आर जे पवार यांनी दिली.

कणकवली तहसीलदार कार्यालय आवारात तहसीलदार आर जे पवार यांच्या हस्ते बस समोर श्रीफळ वाढवून पहिली बस कलमठ मतदान केंद्राकडे रवाना झाली.

तहसील कार्यालयात सकाळपासून ग्रा.पं. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्याची इव्हीएम मशीन ताब्यात घेण्यासाठी जमले होते. याठिकाणी संबंधितानी इव्हीएम मशीन चेक करून अन्य साहित्य त्यांना ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रावर साहित्य घेऊन वाहनातून रवाना झाले. अधिकारी व कर्मचाऱ्यांसह निवडणुकीचे साहित्य मतदान केंद्रावर नेण्यासाठी एसटी बसेससह खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. हि प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान केंद्रावर नियुक्त केलेले पोलीस कर्मचारीहि केंद्रावर जाण्यास रवाना झाले होते. या प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आर.जे.पवार लक्ष ठेवून होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा