You are currently viewing ग्राहक पंचायतची देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर.

ग्राहक पंचायतची देवगड तालुका कार्यकारिणी जाहीर.

वैभववाडी

ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग- सिंधुदुर्ग जिल्हा शाखा अंतर्गत देवगड तालुका शाखा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. देवगड तालुका अध्यक्षपदी श्री. लक्ष्मण सुधीर पाताडे, उपाध्यक्षपदी श्री. मोहन ज्ञानदेव पाटील तर संघटकपदी श्री.शिवप्रसाद पेडणेकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. सविस्तर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे निवडण्यात आली. तालुका अध्यक्ष श्री.लक्ष्मण सुधीर पाताडे, उपाध्यक्ष श्री.मोहन ज्ञानदेव पाटील, संघटक श्री.शिवप्रसाद पेडणेकर, सहसंघटक वसंत शहाकार, सहसंघटक महिला श्रीमती. गीता लळीत, सहसचिव श्रीमती. स्वप्ना केळकर, कोषाध्यक्ष सोनाली कुलकर्णी व सदस्यपदी प्रा.श्री.शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली.


भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते, ग्राहक पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी स्थापित “ग्राहक पंचायत महाराष्ट्र” ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर ग्राहक जागृतीचे पवित्र कार्य करीत आहे. संस्थेच्या राज्य कार्यकारिणीने सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या पहिल्या सभेमध्ये कणकवली, देवगड, मालवण व वेंगुर्ला तालुका शाखा स्थापन करणे व गाव तेथे कार्यकर्ता अभियान राबविण्याचे ठरले होते. देवगड तालुक्यातील कार्यकर्त्यांची विशेष सभा सांस्कृतिक भवन जामसंडे येथे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस. एन.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा सचिव श्री. संदेश तुळसणकर, सहसचिव सामिया चौगुले व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंखे उपस्थित होते.
ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वाने काम करणे, संवाद समन्वयात ग्राहक कल्याण साधणे तसेच प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था काम करीत आहे. ग्राहकांचे संघटन करुन त्याचे प्रबोधन करणे. ग्राहकांचे हक्क, अधिकार व कर्तव्ये यांची जाणीव करुन देणे. तसेच कायदेशीर मार्गदर्शन करणे यासाठी तालुका शाखा काम करणार आहे. तसेच तालुक्यातील जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहनही संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा सचिव श्री.संदेश तुळसणकर व श्री.तेजस साळुंखे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या तत्वानुसार काम करणार असल्याचे नुतन तालुका अध्यक्ष श्री.लक्ष्मण पाताडे यांनी सांगितले. यावेळी काही जुन्या कार्यकर्त्यांना डिजिटल आयकार्ड, संस्थेचा बॕच व संस्थेने प्रकाशित केलेले माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सहसचिव सामिया चौगुले यांची केले. तर आभार श्री.संदेश तुळसणकर यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − 7 =