You are currently viewing महान क्रांतिकारक स्मरणदिन..

महान क्रांतिकारक स्मरणदिन..

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*महान क्रांतिकारक स्मरणदिन…*

 

 

ज्योतींच्या तेजाने उजळली भारतभूमी महान,

हसत हसत फासावर गेले, ठेवला स्वाभिमान..

 

रक्तात उसळला जाज्वल्य देशभक्तीचा ज्वार,

अमर झाले भगतसिंह, राजगुरू, सुखदेव अपार..

 

तरुणाईच्या छातीत धगधगते स्वातंत्र्याचे स्वप्न,

हातात धरला निर्धार, केला बलिदानाचा यज्ञ..

 

अन्यायाच्या विरुद्ध त्यांनी उभारली भिंत ठाम,

इतिहासात कोरले गेले त्यांचे अजरामर नाम..

 

गोऱ्या सत्तेला दाखवला त्यांनी संघर्षाचा मार्ग,

स्वातंत्र्यासाठी पेटवली त्यांनी क्रांतीची आग..

 

हसत हसत त्यांनी कवटाळले मरणाला,

भारत मातेच्या पायाशी जीवनहार अर्पिला..

 

सुखदेवांच्या नजरेत होता स्वप्नांचा प्रकाश,

राजगुरूच्या धैर्याने केला अन्यायाचा नाश..

 

भगतसिंहाच्या विचारांनी चेतवली जनतेची शान,

आजही त्यांचे स्मरण देते प्रेरणेचा महान मान..

 

स्मृतीदिनाच्या या क्षणी वंदन करूया तिघांना,

त्याग, धैर्य, निष्ठा शिकूया त्यांच्या कृतींना..

 

रक्ताच्या थेंबातून उभी राहिली स्वातंत्र्याची वाट,

त्यांच्या बलिदानामुळेच आज आपले आहे स्वतंत्र राष्ट्र..

 

नमन त्या वीरांना, अमर त्यांच्या कथा,

हृदयात कोरलेली त्यांची अमूल्य व्यथा..

 

त्यागाच्या दीपातून उजळला स्वातंत्र्याचा सूर्य महान,

शतशः प्रणाम करून जपूया त्यांचा मान..

 

 

प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा