You are currently viewing बाराखडीचा कल्पित पक्षी

बाराखडीचा कल्पित पक्षी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बाराखडीचा कल्पित पक्षी* 

 

बाराखडी मुळाक्षरांची

शिकवी आम्हा भाषा

व्यंजनांना साथ स्वरांची

जुळती शब्दांच्या रेषा

 

व्याकरणाने साज सजवीला

अलंकारीक झाली भाषा

शब्दसुमनांची रास मढविली

की काढला अक्षर नकाशा

 

घालून बोलीस शब्दवेसन

कुण्या बोलाचे हे सुंदर चित्रण

ही लाट सळसळे मुळाक्षरांची

येई अथांग शब्दसागरा उधाण

 

माळ अक्षरांची गुंफित जाता

स्वर व्यंजनांची होई सुंदर नक्षी

भाषा लिहिणे वाचणे शिकवितो

बाराखडीचा कल्पित पक्षी

 

कवी :-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७.

प्रतिक्रिया व्यक्त करा