You are currently viewing कॅमेर्‍यासोबतचं..जगणं माझं..!!

कॅमेर्‍यासोबतचं..जगणं माझं..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतचं..जगणं माझं..!!*

 

स्मृती अवघ्याचं फितूर

प्रतिबिंबातून सण उत्सवाचा

कॅमे-यानेच जपलं.. मला

नाहीतर..मामला चोरीचा ..

 

बेहोष बेफिकीर मैफीलीत

झुकलो सलोखाच्या दाराशी

दिवेलागणीची वेळ कॅमे-याची

सुखासुखी… नको तोंडघशी ..

 

धुंद चित्तवृत्ती साकारून

मस्तवाल ..अस्मिता लेन्सवर

स्वयंगर्वी भांडखोर व्यक्तीमत्वाचं

प्रतिबिंब.. बिलोरी आरश्यावर ..

 

काळीजवेड्या कॅमे-याची ओळख

मी..ही…..जीवापाड जपली

मिटली..ओठांची कवाडे.. जेव्हा

हिरोच्या..हिरोला…….दृष्ट लागली..

 

स्नेहपाशात..सन्मान हरवला

तळहातावर सप्तरंगात..उतरला

मधुर निमंत्रण…..प्राक्तनाचं

कंप…….कॅमेर्‍याला सुटला..

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा