You are currently viewing टक्कल पडते डोक्यावर

टक्कल पडते डोक्यावर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ यांची अप्रतिम काव्यरचना*

 

 

टक्कल पडते डोक्यावर

नौकरी लागते तेव्हा

वय वाढल्यावर प्रश्न पडतो

लग्न होईल केंव्हा

 

जेमतेम पगारात

काहीच भागत नसते

स्थिरस्थावर होईपर्यंत

आईबाबांची मदत असते

 

होईल सर्व चांगल

दोनाचे चार झाल्यावर

घराला घरपण मिळेल

बायको आल्यावर

 

मग काटकसर करून तो

गणीत लग्नाच जुळवतो

सुखासुखी जगण्यासाठी

राबराब राबतो

पण….

 

पगार असतो कमी म्हणून

काहीच जमून येत नाही

सत्रा प्रश्न विचारतात मुलाला

पण होकार कोणी देत नाही

 

पगार किती तुम्हाला अस्स

नवरी मुलगी विचारते

अर्ध्या वयाची असते ती

तरी म्हणे मी विचार करून सांगते

 

सर्व सुखसोयीयुक्त

नवरा असावा

असा तिचा हट्ट असतो

मग धड्याक्यात लग्न करायला

बापही मागेपुढे पहात नसतो

 

मोठ्ठा पगार होई पर्यंत

निम्मे वय होत असते

स्थिरस्थावर झाल्यावरही

तिच काय नी त्याच काय

लग्न होत नसते

 

सर्वकाही चांगल असतं हो

पण कोणीच जमवून घेत नाही

अवाजवी अपेक्षा करताना

आपल फाटकं पहात नाही

 

वेळ निघून गेल्यावर

नाईलाजास्तव जसे आहे तसे

पदरात पाडून घ्यायचे

मग काही जरी झालं तरी

हळूवार येणाऱ्या अश्रुना

अलवार पुसून घ्यायचे

 

*संजय धनगव्हाळ*

९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 8 =