…..आणि स्वामी समर्थ बाल स्वरूपात अवतरले..”*
शिवतेजनगर-
शिवतेजनगर येथील स्वामी समर्थ मंदीरात स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरतीची तयारी सुरू असताना अचानक बाल स्वरूपातील स्वामी समर्थ प्रकटले. स्वामी समर्थ यांची वेशभूषा केलेल्या दोन वर्षाच्या बालकाचे स्वामी भक्तांनी स्वागत केले. कु. अबीर प्रतिक घावटे याने ही वेषभूषा केली होती. अबीर याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, दीपक पाटील, राजू गुणवंत आणि सेवेकारी मंडळाने विशेष कौतुक केले.

