*नाम.डॉ.रामदास आठवले यांची लोकसभेबरोबर राज्यसभेत ही हॅट्रीक*!
*आर.पी.आय.च्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका -सौ.ज्योती जाधव यांचेकडून अभिनंद*!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री -नाम.डॉ.रामदास आठवले हे तिसऱ्यांदा भारताच्या राज्यसभेत बिनविरोध निवडून गेल्याबद्दल पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा कसई दोडामार्गच्या नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांनी मनपूर्वक अभिनंदन केले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील व त्यांच्या खुल्या पत्रावर आधारीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय स्तरावर नाम.डॉ.आठवले हे खंबीरपणे नेतृत्व करीत आहेत,ते दलीत,बहुजन कष्टकरी जनतेचे प्रामाणिक व विश्वासू नेते आहेत,तळागाळातील जनतेच्या न्यायहक्कसाठी लढत -लढत ते महाराष्ट्राच्या समाजकल्याण कॅबिनेट मंत्री,तिन वेळा लोकसभेत निवडून गेले,आज तिसऱ्यांदा राज्यसभेत निवडून गेले,अशाप्रकारे लोकसभेत आणि राज्यसभेत हॅट्रीक करणारे नाम.डॉ.आठवले यांचे देशभर जनतेतून अभिनंदन आणि स्वागत होत असल्याचे सौ.जाधव यांनी सांगितले.
भारतीय दलीत पॅंथर सारख्या लढाऊ संघटनेचे त्यांनी सुरुवातीच्या काळात खंबीरपणे नेतृत्व करून जनतेवर होणाऱ्या सामाजिक अन्याय अत्याचाराविरुद्ध आवाज उठवून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला,देशपातळीवर चळवळीतील त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकणार नाही.
प्रत्येक सामान्य माणसाचे,कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात,त्यांच्याभोवती सतत प्रचंड गर्दी असते,गर्दीतील या नेत्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड आदर असतो,आमचे नेते -नाम.डॉ.आठवले हे देशाचे कॅबिनेट मंत्री बनावे,अशी सौ.जाधव यांनी आशा व्यक्त केली.
