You are currently viewing शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उद्या रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उद्या रक्तदान शिबिर

मळगाव

सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून उद्या (६ जून रोजी) मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या प्रशालेत कोरोना नियमावलीचे पालन करून सकाळी  ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना महामारीमुळे देशात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी तसेच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या विचारांनी प्रेरित होऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत होणार आहे.

इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी

सुनील राऊळ – ८८०५१४१६११ 

सुधीर राऊळ-९७६५३२०९९०

यांच्याशी संपर्क साधावा. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा