You are currently viewing जनतेची सेवा अविरत करत राहणार – वैभव नाईक

जनतेची सेवा अविरत करत राहणार – वैभव नाईक

कणकवलीत आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात ४५ रक्तदात्याचा सहभाग; थर्मल मशीनचे केले वाटप…!

कणकवली

आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रम व कोरोनाचे सर्व नियम पाळून साजरा करण्यात यावा. या संदर्भात आम्ही सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माझ्या सहकार्याने रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रम आयोजित केले असून या वाढदिवसाच्या आशिर्वादामुळेच भविष्यात सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत राहणार असल्याचे, प्रतिपादन शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले. कणकवली येथील रक्तदान शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

या शिबिराचे शुभारंभ सिंधुदुर्ग कोल्हापूर संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आम.वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, सेना नेते अतुल रावराणे, बाळा भिसे, उपजिल्हा प्रमुख राजू शेट्ये, तालुका प्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, राजू राणे, अँड हर्षद गावडे, राजू राठोड, अवधूत मालनकर, आनंद ठाकूर, विलास कोरगावकर, प्रसाद अंधारी, विलास गुडेकर, निसार शेख, सिद्धेश राणे, महेश देसाई, प्रतिक्षा साटम, वैदेही गुडेकर, सोनाली मेस्त्री, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, धनश्री मेस्त्री शोभा बागवे, जैयबा खूरेशी, मिनल म्हसकर, संजना साटम, लतिका महाडेश्वर, रश्मी बाणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, श्री देव स्वयंभू मंदिर व भालचंद्र महाराज समाधी स्थळाचे दर्शन श्री. नाईक यांनी घेतले. यावेळी संस्थान अध्यक्ष सुरेश कामत व काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण पारकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करत वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच कणकवली शहरातील स्वयंभू मंदिर कणकवली, भालचंद्र महाराज संस्थान, गणेश मंदिर वर्कशॉप, गजानन महाराज मठ कलमठ, महापुरुष मंदिर कणकवली, प्राथमिक शाळा तिवरे, बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली विद्या मंदिर हायस्कूल, कणकवली, आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे, आर्यादुर्गा मंदिर वागदे, फलाहारी महाराज मंदिर कणकवली, सेंट उर्सुला स्कूल वरवडे, कणकवली कॉलेज कणकवली या सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांसाठी तपासण्यासाठी थर्मल मशीनची वाटप आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 3 =