You are currently viewing मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने राज्यातील युवकांना प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु केली आहे. जिल्ह्यातील उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा चे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

आस्थापना, उद्योगासाठी पात्रता पुढील प्रमाणे असेल किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी पात्र असतील. खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेवू शकतात. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळे, सहकारी संस्थांना किमान 20 मंजूर पदाच्या 5 टक्के प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात. आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षा पुर्वीची असावी. आस्थापना, उद्योगांनी EPF, ESIC, GST, GST Certificte of incorporation, Dpit  व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी. आस्थापना, उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. त्याचप्रमाणे या विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

या योजनेचा प्रशिक्षण कालावधी 11 महिने असेल. विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या बँक खाऱ्यात थेट जमा होईल. प्रशिक्षणार्थीने 11 महिन्याचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर आस्थापनेकडून अनुभव प्रमाणपत्र प्राप्त होईल. मुख्यंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेणाऱ्या 12 वी पास उमेदवारांना रु. 6000/-आयटीआय व पदविका उमेदवारांना रु. 8000/- व पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना रु. 10,000 या प्रमाणे विद्यवेतन दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी उमेदवार  महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. उमेदवारांची वयोमर्यादा किमान 18 व कमाल 35 अशी आहे. शिक्षण चालू असलेले उमेदवार योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत. तरी या विभागाच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेस्थळावर नोंदणी  करुन या योजनेचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्र, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा दूरध्वनी क्रमांक 02362-228835 किंवा जिल्हा समन्वयक प्रितेश गजानन परब मोबा. 7066387310 व सिध्देश घाडीगावकर मोबा.7263837143 यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा