You are currently viewing कणकवली महोत्सव 2023 बाल चित्रकला स्पर्धा 4 जानेवारी रोजी

कणकवली महोत्सव 2023 बाल चित्रकला स्पर्धा 4 जानेवारी रोजी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बालकलाकारांना सहभाग घेण्याचे आवाहन

कणकवली

● कणकवली महोत्सव 2023च्या निमित्ताने नगरपंचायत कणकवली च्या वतीने चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे.
*विजेत्या बालकलाकारांना रोख रक्कम स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.*

■ ही स्पर्धा तीन गटात होईल■

*1-आठवी ते दहावी गट -क*
●प्रथम क्रमांक ₹500/-
●द्वितीय क्रमांक₹400/-
●तृतीय क्रमांक ₹ 300/-
● उत्तेजनार्थ 1- ₹100/-
● उत्तेजनार्थ 2- ₹100/-

*2-चौथी ते सातवी गट *ब**
●प्रथम क्रमांक ₹400/-
●द्वितीय क्रमांक₹300/-
●तृतीय क्रमांक ₹ 200/-
● उत्तेजनार्थ 1- ₹100/-
● उत्तेजनार्थ 2- ₹100/-

*3- पहिली ते तिसरी गट अ**

●प्रथम क्रमांक ₹300/-
●द्वितीय क्रमांक₹200/-
●तृतीय क्रमांक ₹150/-
● उत्तेजनार्थ 1- ₹100/-
● उत्तेजनार्थ 2- ₹100/-

◆स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बालकलाकारांनी आपली नावे नगरपंचायत कणकवली येथे किंवा स्वामी आर्ट गॅलरी बाजारपेठ कणकवली येथे दिनांक 3 जानेवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत नोंदवावी…

◆ स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य राहील.

◆ स्पर्धा दि. 4 जानेवारी रोजी सकाळी दहा ते अकरा या वेळेत घेतली जाईल…

◆ स्पर्धकांना कागद नगरपंचायत कडून पुरविला जाईल….

◆स्पर्धकांनी रंग साहित्य स्वतः आणायचे आहे…

◆ चित्रांचा विषय स्पर्धा स्थळी दिला जाईल….

◆ सहभाग घेणाऱ्या बाल कलाकारांना नगरपंचायत कडून सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल…

◆विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र फ्रेम करून, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन महोत्सव स्थळी दिनांक 6 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येईल…

◆विजेत्या स्पर्धकांच्या चित्रांचे व काही निवडक चित्रांचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी मांडण्यात येईल…

🙏या देशाचं भविष्य घडवणाऱ्या बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि कणकवलीच्या सांस्कृतिक वैभवात भर पडावी यासाठी *नगराध्यक्ष समीर नलावडे* यांनी सर्व बालकलाकारांना स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन केलं आहे….

संपर्क-शैलजा कदम 8805292596

प्रतिक्रिया व्यक्त करा