You are currently viewing महिला दिन उत्सव उत्साहात साजरा 

महिला दिन उत्सव उत्साहात साजरा 

केशवनगर सुखी भवन, चिंचवड-

दिनांक ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्माकुमारीज संगीतमय योग यांच्या वतीने करण्यात आले होते.

या उपक्रमात सुमारे ५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला नगरसेविका मनिषा चिंचवडे व अपर्णा डोके या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

कार्यक्रमात बी. के. ज्योती दीदी यांनी महिला दिनाचे महत्त्व, आत्मशक्ती, आत्मसन्मान तसेच समाजातील महिलांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. तसेच बी. के. आकांक्षा दीदी यांनी ध्यान (मेडिटेशन) सत्र घेतले. या सत्रामुळे महिलांमध्ये आत्मचिंतन, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.

महिलांनी विविध गुणदर्शन सादरीकरणे, अध्यात्मिक परिक्षा आणि कला प्रदर्शन करून आपली कौशल्ये मांडली. यावेळी मीना पोखरणा यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली.

संपूर्ण कार्यक्रम योग, ध्यान, संगीत व अध्यात्मिक उपक्रमांनी आनंदी व सकारात्मक वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांनी व्यक्त केले की अशा उपक्रमांमुळे आत्मभान जागृत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो.

ब्रह्माकुमारीज संगीतमय योग सत्र दररोज सकाळी ६ ते ७ वाजता जिजाऊ गार्डन येथे निशुल्क घेतले जाते. दररोजच्या योगामध्ये सहभागी होण्यासाठी दीपक वाडेकर (मो. 9067319114) यांच्याशी संपर्क साधावा, असे निवेदन यावेळी करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा