You are currently viewing लोककल्याणासाठी जनतेच्या थेट संपर्कात असलेले काँग्रेसचे अनमोल रत्न.. 

लोककल्याणासाठी जनतेच्या थेट संपर्कात असलेले काँग्रेसचे अनमोल रत्न.. 

*काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर वाढदिवस विशेष*

 

जनतेच्या आणी कार्यकर्त्याच्या थेट संपर्कात असलेला काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून लोकांना मध्ये राहून राबून काम करणार नेतृत्त्व म्हणजे काँग्रेसचे सावंतवाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांचा आज प्रकट दिन..

आपल्या सामाजिक कार्याने आणी समाजात उतरून कोणताही अडचण सोडविण्याची धमक असणार हे नेतृत्व. सावंतवाडीत आपलं आगळ वेगळ स्थान निर्माण करून लोकांच्या मनात रुतून आपल स्थान करणाऱ्या या व्यक्तिमत्वाने कॉंग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पद केवळ भूषवले नाही तर सत्ता असो की नसो अशावेळी जनतेला न्याय मिळवून दिला. अशा या महेंद्र सांगेलकर यांचा वाढदिवस आज १२ मे रोजी साजरा होत आहे. त्यांच्या या अनोख्या कर्तृत्वावर संवाद मीडिया डिजिटल चैनल ने प्रकाशझोत टाकली आहे.

NSUI च्या विद्यार्थी संघटनेत काम करताना या विचारावर प्रभावित होऊन महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या राजकीय कार्यकर्दीस सुरुवात केली. गेली २० वर्ष कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने काम करताना कला क्रिडा, सामाजिक काम करत पक्ष मजबूत करण्यात मोठा सहभाग आहे.  गोर गरीब जनतेच्या संकटाच्या वेळी धावून जाऊन त्यांना मदत करणे हेच ते आपले आद्य कर्तव्य मानतात. आतापर्यंत ५६ वेळा रक्तदान करून त्यांनी अनेक रुग्णांंचे प्राण वाचवले आहेत. तसेच आतापर्यंत १ ते दीड हजार लोकांमध्ये रक्तदानाची जनजागृती करून त्यांच्याकडून रक्तदान करून घेण्याची किमया त्यांनी केली. अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचार करून घेणे, रक्त पुरवठा करण्यासाठी मदत करणे हीच सामाजिक बांधिलकी जपणारी कामे महेंद्र सांगेलकर यांनी आपल्या जीवनात आतापर्यंत केली आहेत. कॉंग्रेस पक्षाचे काम निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत असताना नेहमीच त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यावी लागली. कॉंग्रेस नेतृत्वाचा आवडता कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्यात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉंग्रेस पक्षाने केलेल्या अनेक संघर्षात, जनतेसाठी केलेल्या अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ही आंदोलने करताना त्यांनी पक्षासाठी अनेक पोलिस केसेस स्वतःच्या अंगावर घेतल्यात. मात्र आजही पोलीस व अधिकारी वर्गात महेंद्र सांगेलकर यांच्या कार्याची दखल घेतली जाते. आणि तेवढेच त्यांना चांगली वागणूक दिली जाते. २० वर्ष कॉंग्रेस पक्षात आत्मीयतेने, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पोच पावती म्हणून कॉंग्रेस पक्षाने त्यांच्या खांद्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करून जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. हि जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याने सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आली. आज हि जबाबदारी ते चोखपणे पार पाडत असून सावंतवाडी तालुक्यात कॉंग्रेसची मजबूत संघटना बांधण्याचे चे काम अविरतपणे करत आहेत. युवकांची मोठी फौज त्यांच्या मागे उभी आहे.

राज्यात महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर त्याकाळात राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेते मंडळीतही मित्रत्वाच नात निर्माण केल. तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला व जगाला कोरोना महामारीने हादरून सोडलं होत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे कोरोना संकट गडद होत होते. मात्र या परिस्थितीतही या संकटात देखील महेंद्र सांगेलकर गरजूंचा पाठीरखा म्हणून उभे राहिले. त्यांनी सावंतवाडी तालुक्यासह दोडामार्ग, वेंगुर्ला येथे देखील गरजूंना मदितीचा हात दिला. धान्य,गरजू वस्तू बरोबर त्यानी मोफत जेवण गोरगरीब लोकांना वाटत एक मदतीचा हात फुडे केला. तर सर्वसामान्य जनतेसाठी उन्हातानात उभ्या असलेल्या पोलिस बांधवांना, डॉक्टर, नर्स यांना थंड सरबत, मोफत जेवण वाटत त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवून दिलं. एवढच नव्हे तर सामाजिक कार्याचा त्यांचा वसा त्यांच्या पत्नीन देखील अंगीभूत करत लॉकडाउनकाळात भुकेलेल्या मजुरांना स्वत: अन्नपूर्णा बनत त्यांना भुकेचा घास दिला. आजही सावंतवाडी तालुका कॉंग्रेसच्या माध्यमातून ते आणि त्यांचे पक्षातील सहकारी सामाजिक कार्यात आघाडीवर आहे.

२०१६ मध्ये गौण खनिज प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाला होता.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गौण खनिज या बाबत झालेलं डंपर आंदोलन फार चर्चेत आल. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अनेक जण नेतृत्व करत होते. त्या नेतृत्वात महेंद्र सांगेलकर यांचा महत्वाचा भाग होता. हे आंदोलन यशस्वी करत ते आपल्या डंपर आंदोलकांच्या युवा उद्योजक यांच्यात ते खंबीरपणे पाठीशी राहिले. तालुक्यात कोठेही संघर्ष, वाद, हानामारी होऊ दे त्या घटनेची माहिती समजल्यावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महेंद्र सांगेलकर घटनास्थळी पोचतात. कोणत्या प्रकारचा तो वाद किंवा संघर्ष असू दे एका क्षणात मिटवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. अशावेळी त्यांच्या संयमी नेतृत्वाची कस लक्षात येते. संघर्ष करण्याची जशी त्यांच्या मनगटांमध्ये ताकद आहे. हृदयामध्ये हिम्मत आहे. तशीच त्यांच्या वाणीमध्ये अर्थात शब्दामध्ये ऐवढा गोडवा आहे की समोरचा किती आक्रमक झाला तरी त्याची आक्रमकता कमी करण्यात महेंद्र सांगेलकर यशस्वी होतात. त्यामुळे अशावेळी त्यांच्या कुशल नेतृत्व चा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो. आज जिल्ह्यात गौण खनिज सारखा महत्वाचा विषय असताना या क्षेत्रात काम व व्यवसाय करणाऱ्या तरुण उद्योजकांना व युवकांना महेंद्र सांगलेकर हे आपले मित्र व हमदर्दी असे वाटतात. त्यामुळे कोणतीही घटना घडली तर महेंद्र आपल्या सोबत असणारच या हेतूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो तरुण वर्ग त्यांच्याकडे बघत असतात. हाकेला महेंद्र सांगेलकर नेहमी तत्पर असतात. यामुळे आपल्या जीवनात काम करताना सावंतवाडी मधील एक युवा व परिपक्व नेता व कार्यकर्त्यांना नेहमी पाठीशी घेऊन पुढे जाणारा नेतृत्व म्हणून महेंद्र सांगलेकर यांची प्रतिष्ठा आहे. त्यांच्या पाठीशी सावंतवाडीतील हजारो युवक आजही उभे असलेले पाहायला मिळत आहेत. महेंद्र सांगेलकर यांच पाऊल पोलीस स्टेशनला पडो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही कार्यालयात पडो त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले जाते. आणि त्यांच्या मतांचा विचार पोलीस आणि अधिकारी करत असतात. यात त्यांच्या नेतृत्वाच्या कलागुणांची कस लागते. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक स्थित्यंतर घडत गेली. कालांतराने नारायण राणे यांच्या पाठोपाठ सावंतवाडी मधून दोनदा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार शिवराम दळवी यानी शिवसेनेला रामराम केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर सावंतवाडी यथील संचयनी येथील आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत असलेले शिवसेनेचे सावंतवाडीतील कार्यालय माजी आमदार शिवराम दळवी यांनी मोठे लॉक ठोकत कार्यालय बंद केले. यानंतर शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते सावंतवाडीत पोलीस स्टेशनला दाखल झाले. मात्र त्यावेळी शिवसेनेत असलेल्या महेंद्र सांगलेकर यांनी जिवाची पर्वा न करता भर बाजारपेठेतून हॉकी स्टिक घेऊन ते गाडीवरून कार्यालय जवळ दाखल झाले. आणि क्षणाचा विलंब न करता शिवसेना कार्यालयाचे दोन्ही लाॅक हातोड्याने तोडून टाकले. आणी शिवसेना कार्यालयात प्रवेश केला आणि ते कार्यालय सुरू केले. त्यांच्या या कार्याचे मोठे कौतुक आणि गाजावाजा झाला. महेंद्र सांगेलकर यांनी कार्यालय स्वतःच्या ताकतीवर उघडले नसते तर कायद्याच्या कचाट्यात ते शिवसेना कार्यालय आजही बंद दिसले असते. एक आक्रमक नेता लाभलेल्या महेंद्र सांगलीकरांच्या बाबतीत त्यांच्या राजकीय जीवनात घडलेले अनेक राजकीय किस्से आहेत. लोकांची कामे झाली पाहिजेत ह्या भावनेने ते नेहमीच काम करत असतात. मग तो कोणताही पक्ष असो. पक्षात मंत्री, खासदार, आमदार किंवा नेतृत्वाचे पाठबळ नसताना देखील महेंद्र सांगलेकर हे आपल्या कार्यकर्त्यांशी खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. यामुळेच त्यांचा पक्ष वाढत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेले बळ यामुळेच आजही महेंद्र सांगेलकर यांच्या नेतृत्वावर लक्ष्य देवून कार्यकर्ते पक्षात प्रवेश करत आहेत. असा हा झुंजार नेतृत्वाला,सामाजिक कार्याचा वसा घेऊन कार्यरत असलेले प्रतिष्ठित युवा नेते महेंद्र सांगेलकर यांना वाढदिवसाच्या संवाद मीडिया कडून हार्दिक शुभेच्छा…!💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − four =