You are currently viewing रोणापाल येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण सोहळा २५ ला….

रोणापाल येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण सोहळा २५ ला….

रोणापाल येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण सोहळा २५ ला….

सावंतवाडी

रोणापाल-मडुरा येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण आणि मुर्ती पुन:पतिष्ठापना सोहळा २५ एप्रिलला साजरा होणार आहे.

यानिमित्त २४ एप्रिलला सकाळी ८ वा. मंगलाचरण, प्रायश्चित्तविधी, देवता प्रार्थना, प्रधान संकल्प, महागणपतीपूजन, पुण्याहवाचन, आचार्यवरण, प्राकारशुध्दी, कंकण अभिमंत्रण, शांतीहोम, गणहोम, देवतास्थापन जलाधिवास, स्नानविधी, कुंडसंस्कार, अग्नीस्थापन, वास्तु, ग्रह व पर्याय होम देवता प्रार्थना, सायं. ७ वा. रामकृष्ण हरी संगीत गुरुकुल, तेंडोली, ता. कुडाळ यांचा गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. २५ एप्रिलला सकाळी ८ वा. मंगलाचरण, शांतीपाठ, प्राकारशुध्दी, आवाहीत देवता पूजन, सकाळी ८.३० वा. श्री. प.पू.दत्तानंद सरस्वती स्वामी, दाभोली मठ यांच्या शुभहस्ते शिखर स्थापना, सकाळी ९ वा. मारुती मुर्तीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा, स्वामींची पाद्यपूजा, महापूजा, तत्वहोम, पुजांगहोम, क्षेत्रपाल बलिदान, महापुर्णाहुती, दुपारी १२ वा. महानैवेद्य, आरती, मंत्रपुष्पांजली, प्रार्थना (गाऱ्हाणे), ब्राह्मणपूजन, आशिर्वाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. जय संतोषीमाता दशावतार नाट्यमंडळ, मातोंड-पेंडूर, ता. वेंगुर्ला यांचा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान देवस्थान समिती, रोणापाल-मडुरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

रोणापाल येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण सोहळा २५ ला….

सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा