You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीची मोफत कुत्रे पकड व निर्बिजीकरण-लसीकरण मोहीम सुरू
Oplus_16908288

कुडाळ नगरपंचायतीची मोफत कुत्रे पकड व निर्बिजीकरण-लसीकरण मोहीम सुरू

भैरववाडीपासून मोहिमेचा शुभारंभ; प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्टच्या सहकार्याने उपक्रम

 

कुडाळ :

कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, गटनेते विलास कुडाळकर, नगरसेवक ॲड. डॉ. राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम व चांदणी कांबळी, संस्थेचे व्यवस्थापक प्रविण कदम, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, अरविंद करलकर, रोहित भोगटे यांच्यासह नागरिक व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा