You are currently viewing आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्चला उत्साहात साजरा होणार 
Oplus_16908288

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्चला उत्साहात साजरा होणार 

कुडाळ एसटी डेपो मैदानावर होणार अभिष्टचिंतन सोहळा; नारायण राणे, उदय सामंत, नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

 

मालवण :

आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा १७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कुडाळ एसटी डेपो मैदान येथे मोठ्या उत्साहात व हजारोंच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री तथा शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कमंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर तसेच आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

मालवण येथील आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी तालुकाप्रमुख मंदार लुडबे, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष सातविलकर, सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, मच्छीमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, महिला तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, गटनेते छोटू ठाकूर, सदस्य गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण, मानसी भोगावकर, रिया बावकर यांसह उपतालुकाप्रमुख भाऊ चव्हाण, बाबू परब, युवा सेना तालुकाप्रमुख स्वप्निल गावडे, अभि लाड, विजय चव्हाण, सुनील घाडीगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दत्ता सामंत म्हणाले, मागील दहा वर्षे विकासापासून वंचित राहिलेला मालवण-कुडाळ मतदारसंघ आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. जनतेच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी ते विधानसभेत सातत्याने करत असून मतदारसंघात मोठा विकास निधी आणत आहेत. त्यांच्या आक्रमक व अभ्यासू शैलीमुळे त्यांनी विधानसभेतही ठसा उमटवला आहे.

प्रत्येकाला आपले आणि हक्काचे वाटणारे आमदार म्हणून निलेश राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठा जनसागर उसळणार असून अभिष्टचिंतन सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा