You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ‘बँक सखी’ चा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार

सिंधुनगरी / (प्रतिनिधी) :

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय, ओरोस येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास बँकेच्या संचालिका सौ. प्रज्ञा ढवन, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, सरव्यवस्थापक दिवाकर सावंत, सरव्यवस्थापक (प्रशासन) शरद सावंत, तसेच बँकेतील महिला कर्मचारी, अधिकारी व बँक सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी केले. यावेळी त्यांनी बँकेच्या कामकाजात महिलांचा वाढता सहभाग आणि त्यांचे उल्लेखनीय योगदान याबाबत माहिती दिली. तसेच मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा बँक सखींचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. प्रीती चव्हाण (शाखा – फोंडाघाट), सौ. तन्वी तुळसुलकर (शाखा – तुळसुली), सौ. शिवानी वेंगुर्लेकर (शाखा – कामळेवीर), सौ. वैशाली बोवलेकर (शाखा – मठ), सौ. दुर्वा गवळी (शाखा – सावंतवाडी) आणि सौ. समीक्षा वालावलकर (शाखा – नेरुर) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांनी महिला दिनाचे महत्त्व आणि महिलांच्या सर्वांगीण प्रगतीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरव्यवस्थापक (प्रशासन) शरद सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा