You are currently viewing बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्गावर नॅनोला स्कोडा कारची धडक

बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्गावर नॅनोला स्कोडा कारची धडक

कुडाळ :

नॅनोला स्कोडा कारची धडक बसल्यामुळे झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास बिबवणे येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडला. अपघातात नॅनो कार थेट पलटी होवून दुभाजकावर जाऊन आदळली. यावेळी तेथे दाखल झालेल्या पोलीस व प्रवाशांनी जखमींना अधिक उपचारासाठी कुडाळ प्राथमिक रूग्णालयात हलविले. एकनाथ उर्फ नाथा शांताराम परब, गोपाळ उर्फ उमेश दत्ताराम सावंत आणि सोनू चंद्रकांत लिंगवत अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 16 =