You are currently viewing बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली.

बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली.

बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली.

सावंतवाडी

आळंदी वरून आलेल्या भीमराव शिंदे वय 75 व त्यांची पत्नी सुनीता शिंदे वय 65 हे दरवर्षी सावंतवाडी विठ्ठल मंदिराला भेट द्यायला येतात असे ती म्हणाली आज सकाळी 11 च्या दरम्यान तरुण भारत कार्यालय समोर ते दोघेही बसले असता भीमराव यांना चक्कर येऊन ते खाली पडले असता त्यांची पत्नी सुनीता शिंदे खूप घाबरली व रडतच तिने लोकांजवळ मदतीसाठी हाक दिली त्यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संजय पेडणेकर यांनी त्वरित रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळी बोलून घेतले त्याच बरोबर संस्थेची रूपा मुद्राळे घटनास्थळी दाखल होऊन सदर भीमराव शिंदे यांना नागरिकांच्या मदत कार्याने अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या रुग्णवाहिकेमध्ये घालून तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्यांचा जीव वाचवला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याचे सर्व स्तराकडून कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा