कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर यांची बांदा येथे बदली

कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर यांची बांदा येथे बदली

दोडामार्ग पोलीस ठाण्यात होते कार्यरत

दोडामार्ग :

दोडामार्ग पोलिसांचा एक हसतमुख तसेच आपलेपणा देणारा म्हणून परिचित असणारा चेहरा म्हणजेच पोलीस नाईक (गोपनीय)सिद्धार्थ माळकर. गेली पाच वर्षे ते दोडामार्ग पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत, पोलीस म्हटलं की वर्दीचा खाक्या, कडक शिस्त. मात्र माळकर यांनी आपल्या या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या हसतमुख चेहऱ्याने अनेक मित्र बनवले, आज त्यांची बदली झाली हे कळताच अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते यापुढे बांदा पोलीस ठाण्यात सेवा देणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा