*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रतिभा माझी जागृत झाली*
पाहून चिमुकला जीव एवढासा
*प्रतिभा माझी जागृत झाली*
नव्हती गवळण नव्हती सुगरण
धरून पाती *एक एक बांधली*
1
लक्ष देऊन पहात बसलो
हिरवी पाने कशी जोडली
नसून शिकली विद्यापिठात
नव्हती कुठली हत्यारे घेतली
2
बुध्दी मिळाली उपजत तिला
निवारा निर्मिण्या कामी आणला
असून आपण *पदवीधारक*
धार न लावली आपल्या बुध्दीला
3
अपमान करून बुध्दी दात्याचा
दगड राहीलो *बिनकामाचा*
घेऊन अक्कल उधार *थोडी*
कविता लिहायचा संकल्प सोडला
4
जुळवून अक्षर शब्द घडविला
अक्कल वापरून प्राण भरला
फुंकून समीर इवल्या *पंखात*
प्रतिभा वापरून नभी उडवला
5
पाहून झटापट इवल्या पक्षाची
प्रतिभा माझी *बहरास आली*
परीश्रमांची पाहून *जुगलबंदी*
कविता माझी उशीरा *जन्मली*
6
विनायक जोशी 🖋️ठाणे
मीलनध्वनी/9324324157
