You are currently viewing गुंतत गेलो

गुंतत गेलो

*अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक, जागतिक साकव्य विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”गुंतत गेलो”*

(वनहरिणी वृत्त)

 

ती नजरेने बोलत गेली, मी नजरेतच हरवत गेलो

ओठांवरती शब्द थबकले अन् ओठांतच गुंतत गेलो

 

स्वप्नांमधली परी भासली उन्हे कोवळी पांघरल्यावर

सूर्याचे होईन किरण ही मनात आशा रुजवत गेलो

 

रुळता कुंतल बटा रेशमी गालांवरती, कुंतल झालो

स्पर्शामधला क्षण नाजुकसा शृंगारासम फुलवत गेलो

 

मागुनि जाता हळूच वळुनी पाठीमागे पाहत होती

छेडत होता पवन तिला मी उगा मनाला फसवत गेलो

 

कधी न जुळले नाते अमुचे, न कळले खरे प्रेम कधीही

एकचतर्फी होते बहुधा हेच मला समजावत गेलो

 

🖊️ दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा