*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सन्मान नारीचा*
देव्हारी विराजमान
नारीची देवी प्रतिमा
श्रध्देला उपमा
नाही….
ती विदुषी
बुद्धिमान सजग गुणी
होतीच पूर्वीपासुनी
युगानुयुगे….
शस्र अस्र
निपुण सर्व शास्त्रात
सन्माननीय जगात
वंद्य….
परकीय आक्रमणे
स्रियांची झाली परवड
बेड्यांनी जड
पावले…
खुंटली प्रगती
असहाय्य झाली स्थिती
नव्हती गणती
दु:खाला…
माय सरस्वती
सावित्रीने दिली लेखणी
हाती धरूनी
शिकविले….
घेतली भरारी
पंखात भरले बळ
प्रगतीचे फळ
हातात…
शिकली सवरली
अन्याय सोसले वर्चस्वाचे
कुटुंब रक्षणाचे
ब्रीद….
समाजात स्रियांना
सन्मान तेव्हाच लाभेल
गर्वाने उंचावेल
मान….
स्वत्व गवसले
तिचे आता तिला
पात्र सन्मानाला
कर्तृत्वाने….!!
००००००००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
