You are currently viewing कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

सिंधुदुर्गनगरी

सन 2022 मधील माध्‍यमिक शालान्‍त प्रमाणपत्र परीक्षा इ. 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इ.12 वी साठी प्रविष्ठ होत असलेल्या नियमित विद्यार्थ्यामध्ये ज्यानी कोविड -19 विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आई व वडील हयात पालक किंवा कायदेशीर  पालक, दत्तक पालक गमावले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे संपुर्ण परीक्षा शुल्क सवलत फक्त या वर्षासाठीच एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

            तरी सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य  यांनी शासन निर्णयाच्या अनुषंगाने पुढील योग्य ती कार्यवाही करावी. तसेच शिक्षण व पालक तसेच इतर सर्व संबंधित घटकांनी यांची नोंद घ्यावी.असे डॉ. शि.ना.पटवे विभागीय सचिव  कोंकण विभागीय मंडळ हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − 3 =