नीट परीक्षेतील गुणवंत अर्णव पिसेचा तळेरे ग्रा.प.तर्फे भव्य सत्कार…

नीट परीक्षेतील गुणवंत अर्णव पिसेचा तळेरे ग्रा.प.तर्फे भव्य सत्कार…

तळेरे प्रतिनिधी :

तळेरे येथील प्रसिध्द डॉ. सुहास पिसे आणि डॉ निलिमा पिसे यांचा मुलगा कु.अर्णव सुहास पिसे याने वैद्यकीय श्रेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी देश पातळीवर घेण्यात आलेल्या NEET परिक्षेत 720 पैकी 650 गुण मिळवत यश प्राप्त केलं आहे.त्या या उज्वल यशाबद्दल तळेरे ग्रामपंचायतवतीने कु अर्णव पिसे,वडील डॉ.सुहास पिसे आणि आई डॉ सौ.निलिमा पिसे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
जि.प बांधकाम सभापती श्री बाळा जठार, कणकवली पंचायत समिती सभापती श्री दिलीप तळेकर, तळेरे सरपंच सौ. साक्षी सुर्वे, ग्रामसेवक श्री युवराज बोराडे, माजी सरपंच- श्री प्रविण वरूणकर, श्री विनय पावसकर उपसरपंच दिपक नांदलसकर, दिनेश मुदस तसेच तळेरे ग्रामपंचायत कर्मचारीवृंद यांनी पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.तसेच
बाजारपेठ मित्रमंडळ तळेरे यांच्यावतीने प्रविण वरूणकर आणि मनोज भांबुरे यांनी अर्णवचा सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तळेरे: वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी अर्णव पिसे याचा तळेरे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करताना मान्यवर…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा