*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*चित्रकाव्य*
तू अशी हसते
प्रसन्न दिसते
तुझ्यामुळे पहाट
सुंदर भासते….
चपकलेला घडा
डोईवर साजरा
झिप-यांनी वेढलेला
किती गोड चेहरा….
गळ्यातली पोत
विटलेला झगा
तमा ना कशाची
आनंदाने जगा….
नको ती पुस्तके
नको ती शाळा
जीवनाच्या वर्गात
यश हमखास बाळा…
वाट्याला आलेलं
जीवन हसत झेलते
रंगीत बांगड्या हाती
आयुष्यघडा पेलते…
मोठमोठ्यांनाही
जे जमत नसते
तुझ्या आत्मविश्वासातून
सिध्दत्वास जाते….!!
~~~~~~~~~~~~~~~~
अरुणा दुद्दलवार✍️
