You are currently viewing पुण्यात १८ जूनला गझल सादरीकरण कार्यशाळा

पुण्यात १८ जूनला गझल सादरीकरण कार्यशाळा

*गझल विश्वातील पहिलाच अनोखा उपक्रम ठरणार..*

 

पुणे (गुरुदत्त वाकदेकर) :

गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे पुण्यात दि. १८ जून रोजी नि:शुल्क गझल सादरीकरण कार्यशाळा आयोजित केली आहे. अशी कार्यशाळा महाराष्ट्रात प्रथमच होत असल्यामुळे नवोदित गझलकारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

गझल मंथन ही संस्था गझल विश्वात अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. गझलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी गझल मंथन साहित्य संस्था महाराष्ट्रभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. असाच एक अनोखा उपक्रम संस्थेने पुण्यात आयोजित केला आहे. महाराष्ट्रात गझल कार्यशाळा होत असतात, परंतु गझल सादरीकरण कार्यशाळा आतापर्यंत झालेली नाही. ही उणीव लक्षात घेऊन गझल मंथन साहित्य संस्थेने गझल सादरीकरण कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत शब्दांचे उच्चार, आवाजातील चढ उतार, आवाजातील भावनांचा अंतर्भाव, सादरीकरणाची गती, हावभाव देहबोली, तरन्नुममधील सादरीकरण, ध्वनिक्षेपक धरण्याची पद्धत, गझल निवड या व इतर अनेक बाबींवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या गझल सादरीकरण कार्यशाळेला ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड, प्रमोद खराडे, शाम खामकर मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा दि १८ जून रोजी सकाळी ९ ते ६ या वेळेत एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेचा नवोदित गझलकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, सहसचिव उमा पाटील, पुणे विभाग प्रमुख प्रदीप तळेकर, पुणे जिल्हाध्यक्ष बा. ह. मगदूम, गझल मंथन पुणे जिल्हा कार्यकारिणी व कार्यशाळा आयोजन समितीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा