*काव्यप्रेमी महाराष्ट्र साहित्य समूहाचे सन्मा सदस्य लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित लघुकथा*
*हार…*
किसनरावांनी आच्याला हाक मारली. ये आच्यावं ssss. आच्यानं मान फिरली आन किसनरावकडं बघितलं.किसन म्हणला,आर जरा मोटा बगुन झेंडूच्या फुलाचा आन गुलाबाच्या फुलाचा ताजा हार आन…आवं ssss.
आच्यानं मान खाली घालूनच हलकासा होकार दिला.आच्या पुढं निघून जाताना त्याला राहवलं नाही. मनातल्या मनात पुटपुटला. हरामी माय मेल्या बर तुला हार सुचतय व्हय रं…..शेताततल्या गोठ्यावर माय पडून होती तवा तिनं मऊ भाकर बांधून देत जा म्हणली व्हती हेचि माय.तवा तूच म्हणला व्हता नाय रं पाण्यात भिजऊन खात जा म्हणून.आता माय मिली समाधान झालं की काय? साला म्हणतो झेंडूचा हार आन म्हणून. कार sss…आलेल्या पाहुन्या रावळ्यांना दावायला व्हय रं……आता काय प्रदर्शन मांडतो व्हयsssss.
मानला हिसका देत देत पुन्हा पटपुटला काय तुला तरी शिव्या दिऊन उपयोग हाय….समाजात सगळीकडे असंच चालू हाय..
घाल घाल शेवटचा हार घाला आईच्या गळ्यात आन हो मोकळा…….
मायला ह्याच्या भजन,कीर्तन,पूजन, करणार हा हरामी. आई-वडिलांना मात्र ह्यांनं कधीच सांभाळलं नाही…
आता घालील मासिकं, वर्ष श्राद्ध पोटभर जेवनवळी लोकांना…
मोटरसायकल हाबाडा देऊन वरती टांग टाकली. हार आन कापडं आणायला धाराशिवला निघून गेला……….
*लेखक:-भूमिपुत्र वाघ.*
