ठाणे :
टिटवाळ्यातील हरिओम व्हॉली या सोसायटीत कवी, लेखक, शाहीर असे अष्टपैलू कलाकार श्री राजेंद्र मधुकर सावंत यांनी आंबेडकर जयंती चे औचित्य साधून काव्य संमेलनाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ ला रात्री साडेनऊला संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाचे संयोजक ठाण्यातील ख्यातनाम ज्येष्ठ युवा साहित्यिक पत्रकार एडवोकेट रुपेश पवार होते. यावेळी बोलताना ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर यांच्यावर खूप काही बोलण्यासारखे आहे परंतु काव्य विचारांच्या माध्यमातून आंबेडकरांचे विचार जागृत करणे हे महत्त्वाचं कार्य आहे. ते आमच्या दोघांकडून झाले. यापेक्षाही मोठा कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी जरूर करू असे विचार रुपेश पवार यांनी मांडून राजेंद्र सावंत यांचे कौतुक केले. राजेंद्र सावंत या कर्मवीर, समाजसेवी माणसाने आंबेडकर जयंती स्व खर्चाने अशा प्रकारे साजरी करून आपल्या सोसायटीतील आंबेडकर अनुयायांना विचाराच्या माध्यमातून आंबेडकर जयंती कशी सादरी करायची हे दाखवून दिले. याकरता रुपेश पवार यांनी महामानवाला करू सलाम हे ब्रिद् योजले ते राजेंद्र सावंत यांना फार आवडले.
महाराष्ट्रातील अनेक नामवंतांची पुस्तके प्रकाशित करणाऱ्या शारदा प्रकाशन या संस्थेने यावेळी कवयित्री माधुरी बर्वे यांचा “आरसा मनाचा” हा गझल संग्रह
पन्नास काव्य कलाकारांना भेट म्हणून देण्यात आला. शारदा प्रकाशनचे ब्रँड संचालक रुपेश पवार यांच्या हस्ते तो देण्यात आला. पवार यांच्या कार्यातून विद्यार्थी, युवकांना प्रेरणा मिळावी म्हणून शारदा प्रकाशनचे प्रकाशक डॉ. संतोष राणे प्रयत्न करत असतात. हा स्नेहबंध जवळ जवळ १६ वर्षापासूनचा आहे. काव्य संमेलनात सहभागी होण्यासाठी नाशिक, सांगली सोलापूर, चाळीसगाव, जालना, ठाणे, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई या सर्व भागातील कवी कवयित्री आले होते. त्यांनी अप्रतिम कविता सादर केल्या. महिला भगिनी मोठ्या प्रमाणात या संमेलनात होत्या. उपस्थित काव्य कलाकारांनी रुपेश पवार आणि राजेंद्र सावंत यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन राजेंद्र सावंत यांच्या गोड वाणीत परिपूर्ण झाले
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विलास देवळेकर (समाजभूषण, साहित्यिक, कवी व गीतकार) यांनी काव्यसमेलनाला रंगतदार केले. मा. श्री शशिकांत सावंत. (जेष्ठ पत्रकार व थोर समाजसेवक, श्रेष्ठ कवी), मा. श्री दत्ताराम म्हात्रे. (प्रसिद्ध जेष्ठ शाहीर महाराष्ट्र राज्य) यांनी पोवाडा सादर करून कार्यक्रमात बहार आणली. मदर सोसायटीचे अध्यक्ष:,श्री भरतजी खरे यांनी कार्यक्रमाकरिता सभागृह व्यवस्था केली होती. यावेळी खरे यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले मा. श्री डॉ ख. र. माळवे. (राष्ट्रीय कवी, श्रामणेर बौद्धाचार्य, मराठी- हिंदी साहित्यिक, राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कार्ते) यांनीही आंबेडकरांचे विचार काव्यातून जबरदस्त मांडले. ८४ वर्षाचे कवी राजरत्न यांनी देखील सभागृह दणाणून सोडले.
या काव्यसंमेलनात रुपेश पवार यांचे वडील ठाण्यातील बाल विद्या मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक बी के पवार यांचा सत्कार मनमोहन रोगे यांनी केला तर रुपेश पवार अध्यक्ष असलेल्या चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट सोबत कायम ठाण्यात वेगवेगळे उपक्रम राबवणारे नाट्यतुषार संस्थेचे सर्वेसर्वा राजेंद्र गोसावी यांचाही सत्कार या संमेलनात झाला. यावेळी गोसावी म्हणाले रुपेश पवार आणि मी स्वतः राजेंद्र सावंत यांच्या जनकार्याला हतभर लावणार आहोत. कारण रुपेश पवार यांच्या माध्यमातून अनेक दानशूर मंडळी पवार यांच्या सामाजिक संस्थेला भेट देत असतात. असे त्यांनी याप्रसंगी उपस्थतांना सांगितले. रुपेश पवार यांची चैतन्य संस्था ग्रंथ भेट उपक्रमातून पुस्तक वाचकांपर्यंत विनामूल्य पोहोचवतात त्याकरता त्यांना साहित्य प्रेमींनी, कलाकारांनी, उद्योजकांनी आर्थिक सहकार्य देऊन पाठबळ द्यावे. असेही राजेंद्र गोसावी यांनी सांगितले.
या कवि संमेलनाला महाराष्ट्रातील अनेक कवी उपस्थित् होते.
=======×========×====
नाट्यतुषार संस्था
