You are currently viewing धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

– सहायक आयुक्त दीपक घाटे

सिंधुदुर्गनगरी

धनगर समाज बांधवाच्या विकासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्यावची योजना अमलात आली असून जिल्ह्यातील सर्व धनगर बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.

            या योजना यशवंतराव चव्हाण  मुक्त वसाहत धर्तीवर सुरु करण्यात आली आहे. ही योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित सर्व धनगर  बांधवांना सुचित करण्यात येते की सदर योजना वैयक्तिक व सामुहीक स्वरुपाची आहे. या योजनेबाबत अर्ज ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांचे मार्फत  गट विकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावित. या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी धनगर कुटुंबातील भटक्या जमाती -क या मुळ प्रवर्गातील असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपये पेक्षा कमी असावे. कुटुंबाचे  स्वत:चे मालकीचे घर नसावे. कुटुंब हे भूमिहीन असावे.  महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असवा. राज्यात कोठे ही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सदर योजनेचा लाभ हा कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी वर्षभरात ६ महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.

            या योजनेचा लाभ  घेण्यासाठीच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाना मिळणारा भुखंड व त्यावरिल घर हे संयुक्तपणे पती व पत्नीच्या नावे केले जाईल मात्र विधवा व परितक्त्या स्त्रियांच्या बाबतीत भूखंड व त्यावरील घर त्यांच्या नावेच केले जातील.  या योजनेंतर्गत मिळालेला भूखंड  व त्यावरील घर लाभार्थी कुटुंबास कोणत्याही कारणास्तव कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करता येणार नाही, तसेच भूखंड व घर कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही. या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच कायदेशीर व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थी कुटुंब हे भुमिहीन असावे.  भूखंडावरील जागेचा वापर हा भाडे तत्वावर अन्य व्यक्ती, कुटुंबास देता येणार नाही. तसेच पोट भाडेकरु सुध्दा ठेवता येणार नाही.  विकाता येणार नाही. तसे आढळून आल्यास सदरचा लाभ रद्द करण्यात येईल व मंजुर केलेल्या निधीच वसुली केली जाईल. प्रस्तुत घराचे बांधकाम झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणारी वार्षिक घरपट्टी लाभार्थ्यांनी स्वत:भरावयाची आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =