You are currently viewing पियाळीच्या पूजा कदम हीने रेखाटले नागराज मंजूळेंचे स्केच…

पियाळीच्या पूजा कदम हीने रेखाटले नागराज मंजूळेंचे स्केच…

सावंतवाडी

कणकवली तालुक्यातील पियाळी येथील प्रतिभावंत युवा चित्रकार पूजा कदम हिने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा कवी नागराज मंजूळे यांचे पेन्सील स्केच पोर्ट्रेट तयार केले आहे. सदरचे स्केच सावंतवाडी येथील जनवादी साहित्य संस्कृती संमेलनास्थळी श्री. मंजूळे यांना पूजा हिने प्रदान केले. मंजूळे यांनीही पूजा हिच्या कलाकृतीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

कला शाखेची पदवीधर असलेल्या पूजा हिला लहानपणापासूनच तिला चित्रकलेची आवड आहे. पण, तिने चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. साधारण चार वर्षांपूर्वी तिने पुन्हा एकदा चित्रकलेच्या सरावास सुरुवात केली. गुगल, युट्यूब आदी सोशल मिडियाच्या माध्यमातून प्राप्त होत असलेल्या माहितीच्या आधारे तिचे स्व:शिक्षण सुरु झाले. चित्रकलेतील पेन्सिल स्केच, स्टोन पेंटिंग, बॉटल आर्ट, लिफ पेंटिंग, बुकमार्क असे तब्बल १२ प्रकार तिने आतापर्यंत हाताळले आहेत.

विशेषत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेखाटलेले स्ट्रिंगआर्ट, शाहू महाराज पुण्यतिथीनिमित्त रेखाटलेले स्टोनआर्ट अशा अनेक कलाकृती लक्षवेधी आहेत. नागराज मंजूळे यांनी देखील स्वतःचे स्केच पाहून पूजाचे भरभरून कौतुक केले. नागराज यांनी दिलेल्या शुभेच्छा येत्या काळात मला अधिकाधिक कलाकृती निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, अशी प्रतिक्रिया पूजा हिने व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा