You are currently viewing श्री दत्त भक्त सौ. सुलभा प्रभाकर नारकर यांचे  अल्पशा आजाराने निधन

श्री दत्त भक्त सौ. सुलभा प्रभाकर नारकर यांचे  अल्पशा आजाराने निधन

वैभववाडी

जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील नाधवडे (गावठण) येथील रहिवासी श्री दत्त भक्त सौ. सुलभा प्रभाकर नारकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षे होते. नाधवडे येथील औदुंबर सेवा ट्रस्टचे संस्थापक प्रभाकर नारकर यांच्या त्या पत्नी होत. औदुंबर सेवा ट्रस्ट च्या कार्यात तसेच तेथील श्री दत्त मंदिराच्या भक्ती कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. येथील परिसरात तसेच श्री दत्त भक्तांमध्ये त्या “मोठी आई” या नावाने परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन मुलगे, विवाहित तीन मुली जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − sixteen =