You are currently viewing टायर फुटल्याने डंपर पलटी; महामार्गावर वाहतूक खोळंबली

टायर फुटल्याने डंपर पलटी; महामार्गावर वाहतूक खोळंबली

टायर फुटल्याने डंपर पलटी; महामार्गावर वाहतूक खोळंबली

खडी रस्त्यावर सांडल्याने मोठा अडथळा; स्थानिकांच्या मदतीने चालक बचावला

सावंतवाडी

कसाल ते गोवा दिशेने खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा टायर फुटल्याने तो दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चालक थोडक्यात बचावला असून, डंपरमधील खडी रस्त्यावर पसरल्याने काही काळ वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप–पत्रादेवी बायपास मार्गावर मळगाव जोशी–मांजरेकरवाडी येथे दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला पलटी झालेल्या डंपरच्या केबिनमधून सुरक्षित बाहेर काढले.
यानंतर महामार्गावरून जाणाऱ्या जेसीबीला थांबवून त्याच्या सहाय्याने रस्त्यावर सांडलेली खडी बाजूला करण्यात आली. त्यामुळे काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. सायंकाळी उशिरा अपघातग्रस्त डंपर बाजूला करण्यात आला.
या मदतकार्यात भाजपचे स्थानिक बुथ अध्यक्ष दीपक जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजय जोशी, अजय राऊळ, बाळा जोशी, सतीश जोशी, बाळा आरोंदेकर, शिवम जोशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा