संतोष साटविलकर आणि माधुरी मसुरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयाचा विश्वास
मालवण :
मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचाच बोलबाला सर्वत्र दिसून येत आहे. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. वराड पंचायत समिती व पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचा गावागावात घराघर प्रचार सुरू असून सर्व ठिकाणी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता वराड पंचायत समिती मतदारसंघात भाजप महायुतीच्या माधुरी मसुरकर विजयी होतील. तसेच शिवसेना महायुतीचे जिल्हा परिषद उमेदवार संतोष साटविलकर यांना वराड विभागातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भाजप नेते खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती निवडणूक लढवली जात आहे. शिवसेना–भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघपणे प्रचारात सहभागी झाले असून, राणे साहेबांच्या नेतृत्वात मोठ्या विजयासाठी महायुती सज्ज झाली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासनिधी मिळून मोठा विकास होऊ शकतो, हा विश्वास व्यक्त होत असल्याने सर्वत्र महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा वाढत आहे.
पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना महायुतीकडून माजी जि.प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर हे अनुभवी व अभ्यासू व्यक्तिमत्व निवडणूक रिंगणात आहेत. तसेच वराड पंचायत समितीत भाजप महिला तालुकाध्यक्ष माधुरी मोहन मसुरकर या निवडणूक रिंगणात असून त्या सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. गाव तसेच पंचायत समिती मतदारसंघाच्या विकासाची तळमळ त्यांच्यात असून गावांच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
पंचायत समिती निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यास राणे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात आणून जनतेला अपेक्षित असे विकासकार्य करण्याचा विश्वास त्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. जास्तीत जास्त निधी आणून संपूर्ण मतदारसंघात विकास करायचा आहे. आदर्श असा मतदारसंघ बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे माधुरी मसुरकर यांनी प्रचारादरम्यान सांगितले.
