You are currently viewing समुद्र सफर.. के.एल.पोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला जणू उधाण!
Oplus_16908288

समुद्र सफर.. के.एल.पोंदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला जणू उधाण!

पालघर / डहाणू:

समुद्र आहे तर जीवन आहे, डहाणू येथे विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते, कांदळ वन, सागरी जीवसृष्टी आणि प्रदूषण मुक्तीवर एक दिवशीय निसर्ग शिबिर आयोजित केले होते. दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित, शाळा के.एल.पोंदा. हायस्कूल, डहाणूच्या विद्यार्थ्यांचे निसर्गाशी सखोल नाते, राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत इको क्लब शाळा, सामाजिक वनीकरण विभाग, इंट्रकट क्लब व के.एल.पोंदा. हायस्कूल, डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने, एक दिवशीय निसर्ग शिबिर (कांदळ वनातील जलीय वन्यजीव, सागरी परी संस्थेतील, प्रांण्यांचे महत्व, प्रदूषण दूर करणे) हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी वन अधिकारी उपस्थित होते. तसेच मुख्याध्यापक श्री.सोपानजी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले. श्री.चंद्रकात खुताडे सर, सौ.अनुपमा जाधव मॅडम यांनी हे शिबिर यशस्वीपणे पूर्ण केले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना सागर संपत्तीचे महत्त्व कळाले. निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे. विशालता आणि सौंदर्याचे प्रतीक सागरी जीवनाचे महत्त्व आहे. समुद्र हे पृथ्वीचे भूषण आहे. मी आहे तरच पृथ्वीवर जीवन आहे. हे समुद्राचे म्हणणे अगदी खरेचं आहे. त्यामुळे समुद्राचे जतन करणे, ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन ही निसर्गाची देणगी पुढच्या पिढीसाठी टिकून राहील.

या उपक्रमासाठी वनपाल डुकले , सामाजिक वनीकरण डहाणू, वनरक्षक के. पी. वाडू सामाजिक वनीकरण, वनपरिक्षेत्र अधिकारी स.मा.सराटे, पाटील व किशोर वाढू सर, व सामाजिक वनीकरण स्टाफ तसेच भूषण भोईर सर व अन्य वनरक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना नास्ता, जेवण, वही, पेन, कॅप देण्यात आली. विद्यार्थ्यांना समुद्र भ्रमंतीची उपयुक्त माहिती मिळाली.

सौ.रसिका घागस मॅडम, उपमुख्याध्यापिका, श्री. सुनिल मोरे सर पर्यवेक्षक, सौ.मनिषा पटेल मॅडम पर्यवेक्षिका यांनी उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय जाणीव निर्माण करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी वर्ग, पालक शिक्षक बंधू व भगीनी देखील आनंदीत झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा