You are currently viewing मैफिल कितीही रंगली तरी कुठेतरी थांबावे लागते…

मैफिल कितीही रंगली तरी कुठेतरी थांबावे लागते…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित लेख*

 

*ओळ रसग्रहण*

 

*मैफिल कितीही रंगली तरी कुठेतरी थांबावे लागते….*

 

प्रारंभ आहे तसाच अंतही आहे…हे जग सतत बदलत असते.‌‌नवे हळूहळू जुने होते व त्याच्या जागी नवीन येते..अगदी संपूर्ण विश्वाचा हा नियमच आहे..‌

कितीही सुंदर लावण्यवती युवती असली तरी ती वर्षागणिक प्रौढ व मग जराजर्जर होते…..हे सगळे बदल मनाने मान्य करतजगायला शिकलं की जीवनवाट सुकर होते.

भरती नंतर ओहोटी ,सूर्योदयानंतर सूर्यास्त होणारच….रमणीय सोनेरी पहाट काळोखाच्या साम्राज्यात बुडणारच….परंतु ती पुन्हा नवरूप लेवून येते….हा आशावाद आपण बाळगायला हवा.चमचमत्या चांदण्या काळ्या मेघांआड लुप्त होतात.पौर्णिमेचा तेजोमय चंद्र अमावस्येला कधी दिसतही नाही…‌

स्वरांनाही तसंच…आदी आहे तर अंतही आहे….हा शेवट अधिक गर्भित,उच्च स्वरुपाचा, कायम आठवणीत रहाणारा‌असावा….मग ती भैरवी गायनाची असो की आयुष्याची….

जीवनाची भैरवीही जीव ओतूनच गायला हवी….!!

कायम स्मृतीत रहायला!!🙏🏻✍️🌹

 

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

*लेखन….अरुणा दुद्दलवार✍️*

प्रतिक्रिया व्यक्त करा