You are currently viewing जागतिक ‘साहित्य कला व्यक्तित्व (साकव्य) विकास मंच’ चा कविकट्टा- ‘काव्यधारा’ या नव्या नावाने सुरू

जागतिक ‘साहित्य कला व्यक्तित्व (साकव्य) विकास मंच’ चा कविकट्टा- ‘काव्यधारा’ या नव्या नावाने सुरू

*साकव्य ‘काव्यधारा’ कविकट्टयामध्ये सदस्यांना सहभागी होण्याचे आवाहन*

 

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच अर्थात् ‘साकव्य’चा कविकट्टा गेली काही वर्षे बंद पडला होता. परंतु ‘साकव्य’ समूहातर्फे नव्या जोशात व नव्या हुरूपासह ‘साकव्य’चा लाडका कविकट्टा पुन्हा नव्याने सुरू करण्यात आला आहे. ‘साकव्य’ समूह प्रमुख श्री. पांडुरंग कुलकर्णी यांच्या प्रेरणेतून ‘साकव्य’चे ज्येष्ठ सदस्य श्री. अनिल देशपांडे तसेच श्री. दीपक जोशी व सुश्री राधिका देशपांडे यांच्या पुढाकाराने हा ऑनलाईन कविकट्टा ‘काव्यधारा’ या नव्या नावासह १९ एप्रिल २०२६ रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू झाला आहे. ‘साकव्य’च्या सदस्यांनी या कविकट्ट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘साकव्य’ समूहातर्फे करण्यात आले आहे.

साकव्य ‘काव्यधारा’ कविकट्टयामधे सहभागी होण्यासाठीची पोस्ट सर्व समूहांवर पाठविली जाते. त्या पोस्टमधील सूचनेनुसार आपल्या स्वरचित तीन कविता 8530944693 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवून स्पर्धेत सहभागी होता येते. तीन पैकी सुचविल्या गेलेल्या दोन कविता ऑनलाईन पद्धतीने गुगल मीट लिंक वर उपस्थित राहून सादरीकरणाची संधी दिली जाते. एका कविकट्ट्यावर १० कवींना सादरीकरणासाठी निमंत्रित केले जाते. या कविकट्ट्याची वेळ साधारणतः शनिवारी सायंकाळी ७.०० ते ८.०० अशी ठेवण्यात येते. या कार्यक्रमासाठी इतर सदस्य व रसिकदेखील दिलेल्या गुगल मीट लिंक/आयडी वर जॉइन करून प्रेक्षक/श्रोता म्हणून सहभागी होऊ शकतात. ऑनलाईन कार्यक्रमात वेळ असल्यास, अध्यक्षांच्या परवानगीने इच्छुक श्रोत्यांना देखील सादरीकरणाची संधी देण्याचा प्रयत्न केला जातो.

सहभागी कवि-कवयित्रींना प्रोत्साहन म्हणून सदर कविकट्ट्यावर सादर झालेल्या निवडक कविता/रचना लवकरच ‘साकव्य’ समूहातर्फे ‘शॉपिजन’ मार्फत इ-बुक (काव्यसंग्रह) रुपाने प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा