You are currently viewing श्रीमती रतन अंबादास कराड यांना “श्रमजीवी पत्रकार गौरव 2021 -22” पुरस्काराने सन्मानित

श्रीमती रतन अंबादास कराड यांना “श्रमजीवी पत्रकार गौरव 2021 -22” पुरस्काराने सन्मानित

नांदेड( प्रतिनिधी) :

जि .प. प्रशाला हदगाव .जि .नांदेड येथील सहशिक्षिका श्रीमती रतन अंबादास कराड यांना उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश येथे पत्रकार प्रेस परिषद इंडिया (दिल्ली)तर्फे “श्रमजीवी पत्रकार गौरव पुरस्काराने” गुरुवार दिनांक 30 डिसेंबर 20 21 रोजी एका भव्यदिव्य कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी पत्रकार प्रेस परिषदेने प्रत्येक राज्यातून फक्त दोन व्यक्तींची निवड केली होती .महाराष्ट्रातून श्रीमती रतन अंबादास कराड यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यविषयक, वृत्तपत्रीय आणि कृषी क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आणि सामाजिक योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.त्यांनी केलेले कार्य उत्कृष्ट व आदर्श समाज घडविण्यासाठी बहुमोल कार्य ठरले आहे. या कामगिरीची दखल घेऊन पत्रकार प्रेस परिषद इंडिया दिल्ली यांनी श्रीमती कराड यांना सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाबा कृष्णदेव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार परिषदे चे राष्ट्रीय सचिव मा.ऋषभ मिश्रा हे होते. याप्रसंगी श्रीमती कराड यांच्या कार्याची माहिती करून दिली आणि त्यांचा पदक, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार केवळ त्यांच्यासाठीच महत्त्वाचा आहे असे नाही तर या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रीयांची मान अभिमानाने व सन्मानाने उंचावली गेली आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − 14 =