आरोंदा येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश…

आरोंदा येथील ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश…

सावंतवाडी

आरोंदा येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केला. सुर्यकांत नाईक, हनुमंत नाईक, दिलीप नाईक, नंदकिशोर नाईक आदींनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात पक्ष प्रवेश केला. तर येत्या काळात ५० हून अधिक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.‌‌ सावंतवाडी पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, व्हीजीएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, उद्योग व व्यापार जिल्हा कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, उद्योग व व्यापार महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, युवती कार्याध्यक्ष संपदा तुळसकर, युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, जिल्हा युवक उपाध्यक्ष अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, जहिरा ख्वाजा, याकुब शेख, सुरेश वडार, मनोज वाघमोरे, अभिजित पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा