मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचा कणकवलीत अपघात
कणकवली:
कणकवली शहरातील उड्डाणपुलावर मुंबईहून – गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा पंच कारचा अपघात झाला. यावेळी सदर कारमधून पाच जण प्रवास करत होते. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाताना कारचा टायर फुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली आणि विरुद्ध दिशेने फिरून उजव्या बाजूने पलटी झाली. हा अपघात रविवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास पल्लवी लॉज समोरील उड्डाणपुलावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुभाष शिवगण घटनास्थळी दाखल झाले होते.
