*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कॅमेर्यासोबतचं…माझं जगणं..!*
माणूसकी जपणारी व्यक्तीमत्व
दुर्मीळ ……होत चालली
आयुष्याचा समतोल राखण्या
ह्दयांत कॅमेर्यासोबतच ..जपली
घरपणं देणारी…माणसं
कॅमे-यानेच.. कैद केली
गतकाळात बांधलेली हवीहवीशी
माणसं प्रतिबिंबातून ..उतरली
विसरलेल्या क्षणांना वेचतवेचत
वाटेवर उतरून माझ्याकरता रेंगाळली
कॅमे-याला..चांगली सवय
भूतकाळ कधीही..चघळला नाही
ज्यांनी…हात दिला ..त्यांना
कधीही निराश केले नाही..
मुक्यामाराचे बोलके डाग
विकृत मानसिकतेने दिले
मनास लावून घेऊ नकोस
कॅमेर्यासोबत..हसायला लावले
तीनशेसाठ अंशातून मूल्यमापन
लेन्समधून कॅमेर्याने..केले
व्यक्तीमत्वाचं आरोग्य जपतांना
वास्तवात.. हिरोपद..लाभले..
बाबा ठाकूर
