सहाक्षरी काव्यप्रकार – वेदना

सहाक्षरी काव्यप्रकार – वेदना

विरह वेदना,
रोजच्या मनाला.
कशी मी आवरू,
माझ्या भावनेला.

आठव येताच,
गाली ती ओघळ.
अश्रू म्हणू की,
पाणीच नितळ.

ते दिस आपुले,
सुखात गेलेले.
दुःखही अगदी,
हसत झेलले.

नको तुझा आता,
मजला आधार.
कळून चुकले,
मला निराधार.

अस्तित्व तुझंच,
न जीवनी माझ्या.
ना उरल्या सख्या,
आठवणी तुझ्या.

नकोच आता तू,
मज स्वप्नी येऊ.
भावनांना माझ्या,
अडवून ठेऊ.

विसरू पाहते,
तुझ्या त्या स्मृतींना.
नको आस दाऊ,
आता पुन्हा पुन्हा.

(दिपी)✒️
दीपक पटेकर. सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा